Friday, October 15, 2010

पालक पनीर इन different style

साहित्य:
पालक, पनीर, कांदा, टोमॅटो , लसुण (जास्त) आणि आलं बारीक़ चिरून,
हिरवी मिर्ची पेस्ट, मीठ,
फोडणिचं साहित्य, गरम मसाला, तेल, तूप, तिखट पूड
कृति:
पनीर फ्राय:
पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या
छोटं pan/kadhai use करा
त्यात तूप गरम करा
जीरे घाला. थोडी हळद घाला
पनीरचे तुकडे घाला
चांगले fry करून घ्या. बाजूला काढून ठेवा.

पलक-पनीर
पालक धुवून एकदम बारिक चिरून घ्या.
तेल गरम करून त्यात भरपूर जीरे, भरपूर लसुण आणि हिरवी मिर्ची पेस्ट घाला
आलं घाला
कांदा घाला, परतवून घ्या
टोमॅटो घाला आणि सगळं कांदा brown होईपर्यंत परता
मग त्यात थोडी हळद, थोडी तिखट पूड आणि गरम मसाला घाला
सगळं मिक्स करून घ्या
मग चिरलेला पालक घाला
निट परतवून घ्या ६-७ min
पालकाचं पाणी जिरलं पाहिजे
मीठ घाला
मग तळलेलं पनीर घाला त्यात जिऱ्यासहित
झाकण ठेवून वाफ दया साधारण ६-७ min
गरम गरम पालक पनीर पोळी / नान बरोबर serve करा